दिवाळी पहाट २०२५ — नांदेडकरांसाठी संगीत, नृत्य आणि भावनांचा संगम!

📍 नांदेड | प्रतिनिधी अहवाल
दिवाळी पहाट २०२५ — नांदेडकरांसाठी संगीत, नृत्य आणि भावनांचा संगम!
पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायनाने कार्यक्रमाला होणार सुरुवात
नांदेड जिल्हा प्रशासन, श्री गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “दिवाळी पहाट २०२५” या सांस्कृतिक पर्वाची नांदेडकर आतुरतेने वाट पाहत आहेत.
हा कार्यक्रम शहरातील बंदाघाट येथे २० ते २२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणार असून, प्रत्येक दिवस नांदेडच्या रसिकांसाठी एक आगळा-वेगळा सांगीतिक अनुभव घेऊन येणार आहे.

🎤 पहिला दिवस — संगीत अनुराधा
सोमवार, २० ऑक्टोबर | पहाटे ५.३० वा.
संगीत रसिकांसाठी यंदाच्या दिवाळी पहाटचे विशेष आकर्षण ठरणार आहे प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचा सुश्राव्य गायन कार्यक्रम.
त्या भावगीतं, भक्तिगीतं आणि लोकप्रिय चित्रपट गीतांचा सुरेल वर्षाव रसिकांवर करतील.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी केली असून, सहगायक म्हणून रविंद्र आहिरे (मुंबई) सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ५.३० वा.
“रागरंग” — विविध वाद्य आणि गझल फ्यूजनवर आधारित कार्यक्रम सादर होईल.
या कार्यक्रमात मिलिंद तुळणकर, कल्याणी देशपांडे, प्रकाश सोनकांबळे, ऐनोद्दीन वासरी, डॉ. गुंजन शिरभाते, सौ. आसावरी जोशी आणि बालासाहेब पाटील सहभागी होतील.
रात्री ८.३० वा.
नृत्य रसिकांसाठी “नृत्य झंकार” — दिग्दर्शन डॉ. सान्वी जेठवानी, तर शुभम बिरकुरे आणि स्थानिक कलावंतांची विशेष उपस्थिती.
🎶 दुसरा दिवस — स्वर सरिता
मंगळवार, २१ ऑक्टोबर | पहाटे ५.३० वा.
प्रख्यात निवेदक प्रा. सुनिल नेरलकर यांच्या संकल्पनेतून सादर होणाऱ्या या कार्यक्रमात
पं. जसराज यांची शिष्या अंकिता जोशी शास्त्रीय संगीतावर आधारित सादरीकरण करतील.
सहगायक — अभिनय रवंदे, प्रशांत गाजरे, विश्वजित कोलंबीकर, अनहद वारसी, चिन्मय मठपती, अदिती रवंदे आणि ईश्वरी जोशी.
🎬 तिसरा दिवस — रुपेरी सोनसळा आणि जियारत
बुधवार, २२ ऑक्टोबर | पहाटे ५.३० वा.
पत्रकार विजय जोशी यांच्या निर्मितीतून आणि अॅड. गजानन पिंपरखेडे यांच्या निवेदनातून
“रुपेरी सोनसळा” — १९६० ते १९८० दरम्यानच्या सुवर्णकाळातील मराठी चित्रपट गीतांचा सोहळा.
यात पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे आणि विजय जोशी सहभागी होतील.
वाद्यवृंदाची साथ राज लामटिळे, स्वप्नील धुळे, भगवानराव देशमुख, रविकुमार भद्रे आणि रतन चित्ते करणार आहेत.
सायंकाळी ५.३० वा.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून, काफिला कोल्हापूर निर्मित
“जियारत” — मराठी, हिंदी, उर्दू प्रेमसाहित्यावर आधारित संगीतमय प्रेमयात्रा सादर होईल.
लेखन-दिग्दर्शन सतीश तांदळे, संगीत ऋषिकेश देशमाने.
गायन — ओंकार पाटील, सुरज कांबळे, कौस्तुभ शिंदे, संपदा माने.
❤️ सामाजिक भान जपणारा उपक्रम
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी
या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत पेटी ठेवण्यात आली आहे.
संयोजन समितीच्या वतीने सर्व रसिकांना सढळहस्ते योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🎙️ मनचाहा माईक इंडिया न्यूज | Manchaha Mic India News
📞 +91 7385475831 | +91 8421314193
🌐 https://manchahamicindia.com
📧 manchahamicindia@gmail.com


